लासुर्णे येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती.

 लासुर्णे येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती.


उद्धट, ता. २९ : लासुर्णे (ता. इंदापूर) महिला मेळावा व महिला दक्षता समिती यांच्या कार्यक्रमांमध्ये वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी लासुर्णे येथील महिला मेळावा व महिला दक्षता समितीच्या कार्यक्रमात सायबर अवेअरनेस बद्दल गावकऱ्यांमध्ये जनजागृती केली. उपनिरीक्षक चौधर यांनी सांगितले की, सध्या फेसबुक व इतर सोशल मिडियावरून 'मला तातडीने पैसे हवे आहेत' असे मेसेज पाठवून, बनावट जाहिरातींद्वारे किंवा एसएमएसमधील लिंकवरून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलवर 'लॉटरी लागली' असे खोटे कॉल/मेसेज येऊ शकतात; अनोळखी बँक खात्यावर पैसे जमा करू नयेत. ब्रँडेड वस्तूंवर मोठ्या सूट दाखवून बनावट ई-शॉप्सही फसवू शकतात. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या व्हिडिओ-कॉल आणि स्क्रीन-शेअरिंगच्या विनंत्या सावधपणे स्वीकाराव्यात कारण त्या रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग होऊ शकते. आपला बँक ओटीपी, डेबिट-क्रेडिट कार्ड क्रमांक, पिन, सीव्हीव्ही आदी गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नका, संशयास्पद लिंक क्लिक करू नका, अनधिकृत अॅप डाऊनलोड करू नका, मोबाईल व संगणकावर अँटीव्हायरस इन्स्टॉल व अपडेट ठेवा. संशयास्पद व्यवहार आढळल्यास स्थानिक पोलिसांना कळवा, असे पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post