उद्धट- मानकरवाडी रस्त्याचे काम रखडले.
उद्धट, ता. ३० : उद्धट ते मानकरवाडी (ता. इंदापूर) या मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना ये जा करताना कसरत करावी लागत आहे. मात्र, ठेकेदाराचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. उद्धटवरून मानकरवाडी जाणारा रस्ता हा वर्दळीचा आहे. या ठिकाणी चांगल्या व भरीव रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी सिमेंटचा पक्का रस्ता मंजूर करून दिला. त्यावर ठेकेदाराने काम लवकरात लवकर सुरू केले. मात्र, पाऊस सुरू झाल्यापासून या ठिकाणचे काम बंद पडले आहे. उखडलेला रस्ता, पाणी, चिखल यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांनी ठेकेदाराला विचारले असता, दिवाळीनंतर काम सुरू होईल, असे ठेकेदाराने आश्वासन दिले. मात्र, तरीही या ठिकाणी काम सुरू झाले नाही. नागरिकांना मात्र या सगळ्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.
उद्धट (ता. इंदापूर) : रस्त्याची झालेली दुरवस्था.