फडतरे नॉलेज सिटी येथे वक्तृत्व स्पर्धा.

14 नोव्हेंबर बालदिन व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत कळंब –वालचंदनगर येथे वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये पहिली ते चौथी एक गट,पाचवी ते सातवी एक गट आणि आठवी ते बारावी एक गट अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये स्पर्धेचे नियोजन केले होते. इयत्ता पहिली ते चौथी विषय स्वराज्य जननी जिजाऊ , माझी शाळा माझा अभिमान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे विषय होते व पाचवी ते सातवी शिवचरित्र एक संस्काराचा धडा, महाराष्ट्रातील संत परंपरा एक अमूल्य ठेवा ,माझ्या स्वप्नातील भारत हे विषय होते.आठवी ते बारावी शेतकरी बाप जगाचा पोशिंदा, पालटले स्वप्न समाजाचे, महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे आणि चौथा विषय ए आय आणि रोजगार धोके आणि संधी या स्पर्धेसाठी माळशिरस बारामती, फलटण, इंदापूर,दहिवडी, दौंड तालुक्यातील एकूण 60 शाळांनी सहभाग घेतला होता. एकूण 240 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे प्रथम गट सानवी सुनील कन्हेरकर अनंतराव उत्तेजनार्थ प्रथम पवार इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली द्वितीय उत्तेजनार्थ आयुष्य सचिन साबळे इयत्ता चौथी जिल्हा परिषद शाळा जंक्शन आणि तृतीय क्रमांक भैरवी प्रीतम लावंड इयत्ता दुसरी एल.जी बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल पळसदेव द्वितीय क्रमांक अंशिका गणेश चव्हाण इयत्ता चौथी श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब आणि प्रथम क्रमांक कर्ण महादेव साळुंखे जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती. पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांक त्रिशा प्रकाश गावडे इयत्ता सहावी की एज्युकेशन बालविकास मंदिर गुणवडी दुसरा क्रमांक राजवर्धन जयंत चिंचकर इयत्ता सातवी एस एन डी इंग्लिश मीडियम स्कूल नातेपुते तृतीय क्रमांक आरोही संतोष भरणे इयत्ता पाचवी श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब उत्तेजनार्थ पहिला मानवी सोमनाथ चव्हाण इयत्ता पाचवी हनुमान विद्यालय शिंदेवाडी उत्तेजनार्थ बारावी गटांमध्ये प्रथम क्रमांक आनंदी रायबा भगत श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब द्वितीय क्रमांक कार्तिकी अनिल किर्दक रामानुज सायन्स अकॅडमी लासुर्णे आणि तृतीय क्रमांक अनुदान धनंजय सावंत दाते प्रशाला नातेपुते आणि उत्तेजनार्थ ज्ञानेश्वरी सुनील सुळ श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल व दिपाली कल्याण राऊत वालचंद विद्यालय कळंब अशा विद्यार्थ्यांनी यश संपादित संपादित केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विवेक शहा प्राचार्य ज्ञानराजा इंग्लिश मीडियम स्कूल आळंदी तसेच सन्माननीय भाऊसाहेब संचालक छत्रपती साखर कारखाना भवानीनगर तसेच सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष उत्तम दादा फडतरे ,संस्थेच्या सीईओ कल्याणी फडतरे तसेच पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य सोनाली देशमुख, डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रवीण उत्तेकर सर तसेच ज्युनिअर कॉलेज प्राचार्य अर्चना वाघ मॅडम तसेच श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य अनिता भाटिया तसेच अकाउंट विभागाच्या मोनिका आखाडे मॅडम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले व सर्व शिक्षक यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post