खडकी देऊळगावराजे गटात आयात उमेदवाराला उसाचे राजकारण भोवणार?

विधानसभेला विरोध केल्याचा पक्षातीलच कार्यकर्ते काढणार राग ? लोकसेवक: न्यूज नेटवर्क खडकी,देऊळगावराजे या गटातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (A P) पक्षाकडून आयात उमेदवार लादला जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू असून,या पक्षातील आयात उमेदवारावरती प्रचंड नाराजी व्यक्त होत असताना दिसत आहे. कारण की या लादल्या जाणाऱ्या उमेदवाराने ऊसाचे प्रचंड राजकारण केले असून,भीमा पाटस सहकारी साखर कारखाना बंद असताना आमदार राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे.जसे की विरोधातील आणि स्वतःच्या मर्जीतील नसतील अशा लोकांची यादी तयार करणे आणि कारखान्याचे कामगार यांच्याकडे ती यादी द्यायची आणि तुम्हाला महाराजांनी भेटायला बोलावले आहे,भेट घेतली नाही तर तुमचा ऊस तोडला जाणार नाही‌.असे सांगितले जायचे मग बिचारा शेतकरी भेट घ्यायला गेल्यानंतर त्याला अरेरावीची भाषा वापरली जायची आमच्या विरोधात राजकारणात काम करतो,तू या पार्टीचा तू त्या पार्टीचा मग तुझा ऊस आम्ही गाळपास कसा आणायचा,तु येथून पुढे आमच्या विरोधात काम केल्यास तुझा पुढच्या वर्षी ऊस तोडला जाणार नाही असा सज्जड दमच दिला जायचा.बिचारा शेतकरी महाराजांचे बोलणे खाऊन माघारी यायचा कारण ऊस तोडण्यासाठी दुसरा पर्याय नसायचा. त्यामुळे या आयात आणि लादल्या जाणाऱ्या उमेदवारावरती पूर्व भागातील आणि खडकी,देऊळगावराजे गटातील प्रचंड जनता,मतदार,ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत.तसेच विधानसभेला माजी आमदार रमेश(आप्पा)थोरात यांना विरोध केला होता त्याचा राग मनात धरून पक्षातीलच कार्यकर्ते बोलू लागले आहेत की आता योग्य वेळ आली आहे या महाराजाला त्याची जागा दाखवण्याची,याने विधानसभेला आप्पांना विरोध केला आहे मग आता महाराजांना का सोडायचे या महाराजांचा जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत कडेलोट करायचा,आता संधी चालून आल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.या निवडणुकीत आयात उमेदवाराला धडा शिकवण्याची आयती संधी चालून आल्याची जोरात चर्चा दौंडच्या पूर्व भागात रंगू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post