उद्धटचे बसस्थानक वापराविना पडून.

 

उद्धट ता इंदापूर येथील व स्थानक वापराविना पडून राहिले असून त्याची डागडूजी करून प्रवाशांच्या वापरणे योग्य करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे 

  उद्धट येथील बस स्थानक सुमारे दहा वर्षांपूर्वीचे जुने असून हे बस स्थानक बांधल्यानंतर BKBNया रस्त्याचे काम पूर्ण झाले हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा सुमारे तीन ते चार फूट उंच केले असल्याने अगोदर बांधलेले बस स्थानक हे रस्त्याच्या खाली गेले व रस्ता वर आला यामुळे बस स्थानकात अडगळ निर्माण झाली येथून दोन्हीकडून येणारे एसटी बस प्रवाशांना दिसत नाही तसेच एसटी आली असता बस स्थानकातून उठून रस्त्यावर येईपर्यंत बस निघून जायची असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांनी बस स्थानकात जाणे टाळले व ते बस स्थानक अडगळीचे ठिकाण बनले त्यामुळे प्रशासनाने केलेला खर्च पूर्णपणे पाण्यात गेला असे म्हणणे वावगे ठरणार नाही यावरती ग्रामस्थांची अशी मागणी आहे की प्रशासनाने बस स्थानक नवीन बांधून द्यावे 

  तसेच कुरवली येथील चौकामधील शाळेच्या विद्यार्थ्यांची गर्दी होते त्या ठिकाणी मात्र बस स्थानक नाही तिथे ऊन वारा पाऊस आले असता या ठिकाणी कोणतीही थांबायची व्यवस्था नाही तरी प्रशासनाने जागा उपलब्ध करून बस स्थानक बांधून द्यावे ही विद्यार्थी व पालकांची मागणी आहे 

....................................................................

 अधिकृत बस स्टॉप असूनही प्रवाशांची गैरसोय होते भर उन्हात शाळेमधील  मुलांना उभे राहावे लागते. त्या स्टॉप वरती उभे राहण्याची सोय सुद्धा नाहीये , महत्वाची बाब या BKBN रस्त्यावरती बस प्रवासी न दिसल्याने काही वेळा थांबत सुद्धा नाहीये कित्येक वेळा असे झाले की स्कूलमधील जाणारे विद्यार्थी सुद्धा तिथे उभे असतात तरी बस आलेली समजत नाही अचानक आलेली बस डायरेक्ट प्रवासी न दिसल्यामुळे निघून जाते व त्यानंतर या ठिकाणी पुढच्या बस साठी दोन तास वाट बघावी लागते

 नजिया जावेद सय्यद 

 सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका 

Post a Comment

Previous Post Next Post