उजनी धरण हद्दीतील बेकायदेशीर माशांची तळे नष्ट करणार : रवींद्र जगताप उपविभागीय अधिकारी

उजनी धरण हद्दीतील बेकायदेशीर माशांची तळी नष्ट करणार : रवींद्र जगताप,उपविभागीय अधिकारी 

 लोकसेवक न्यूज नेटवर्क इंदापूर :-
    उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रामधील भिमा नदीच्या पात्रालगद अनेक गावातील शेतकऱ्यांनी,परप्रांतीयांनी आणि व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मांगुर पालन करण्यासाठी नदीपात्रात अतिक्रमण करून बेकायदेशीर तलाव तयार केले आहेत. त्या तलावातील मांगुर माशांसाठी खाद्य म्हणून कोंबड्यांची आतडे- कातडे व मेलेली जनावरे खाद्य म्हणून तलावामध्ये टाकले जाते. उजनी धरण क्षेत्रातील पाण्यामध्ये यातील काही मांगुर माशांची तळी फुटून मांगुर मासे भीमा नदीच्या पत्रात जाऊन लहान माशांना खात असतात.तसेच या तलावातील दुषीत पाणी भिमेच्या पाण्यात सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पात्रातील पाणी दुषित होत आहे,तसेच भिमेच्या सौंदर्याला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण झाली आहे. भिमेच्या पात्रात अतिक्रमणाचा मोठा विळखा पाहायला मिळत असताना,देखील संबंधित अधिकारी हे मूग गिळून बसलेले पाहायला मिळत आहेत.यामध्ये परप्रांतीय,व्यापारी मच्छिमार आणि अधिकारी हे "चोर चोर मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ" असे काम करताना पाहायला मिळत आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अधिकारी कर्तव्यात कसूर करताना पाहायला मिळत आहेत. तसेच हजारो टन मेलेल्या कोंबड्यांचे मांस भिमा नदीच्या पात्रात टाकले जात आहे,त्यामुळे नदिकिनारी असणाऱ्या गावातील बहुतांश लोकांना कॅन्सरचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.म्हणून या ठिकाणी आरोग्याचा मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत जलसंपदा विभागाचे इंदापूरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लवकरात लवकर आम्ही संबंधित संपादित क्षेत्रातील अतिक्रमण केलेली बेकायदेशीर तळी काढण्यासाठी लेखी आदेश दिलेले आहेत,लवकरच त्याची कारवाई केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post