दौंड पुरवठा शाखेत दिवसाढवळ्या गोरगरिबांची होतेय लूट
लोकसेवक
न्यूज नेटवर्क
इंदापूर
:- इंदापूर तालुक्यातील पुरवठा शाखेत रेशन दुकानदार आणि तालुक्यातील रेशन कार्डधारक तसेच नवीन अन्नसुरक्षा योजनेत नावे समाविष्ट करण्यासाठी दौंड तहसील कचेरीतील पुरवठा शाखेतील एक नवीन मोठा अधिकारी फक्त आठवड्यातून दोनच दिवस हजर असतो,त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना देखील या दोनच दिवसात गडगंज पैसा कमवून निघून जातो.
याची सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील १५२ रेशन दुकानदार यांच्याकडून प्रत्येकी दर महिन्याला पंधराशे रुपये हा मोठा अधिकारी त्यांच्याच काही मर्जीतील रेशन दुकानदार आणि झिरो कर्मचारी यांच्यामार्फत पैसे गोळा करत असतात,आणि या मोठ्या गब्बरसिंग ला देत असतात.तसेच जर तालुक्यातील रेशन धारकांना विभक्त रेशन कार्ड,नवीन रेशन कार्ड तसेच रेशन कार्ड मध्ये नविन नावे समाविष्ट करणे इत्यादी कामांसाठी ५०० ते १५०० रुपये पर्यंत हा अधिकारी पैसे घेतो.तसेच काही धनदांडग्यांची नावे अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील काही रेशन दुकानदार आणि झिरो कर्मचारी तसेच त्यांच्याच ऑफिस मधील काही चाटुगिरी करणारे कर्मचारी देखील एजंटचे काम करत असून तालुक्यातील गोरगरीब जनतेकडून आणि रेशन दुकानदारांकडून त्यांना मलिदा गोळा करून देत आहेत.
त्यामुळे या पुरवठा शाखेतील हा हप्ते खोरीचा आणि गोरगरीब लोकांना दिवसाढवळ्या लुटण्याचा धंदा बंद न केल्यास मराठा संघर्ष योद्धा राजाभाऊ कदम यांनी या गब्बर ला चांगलीच अद्दल घडविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत गब्बरसिंगसाठी त्याचे झिरो कर्मचारी,एजंट पैसे घेतानाचा व्हिडिओ हाती लागला असून लवकरच याचा भांडाफोड करणार असल्याचे देखील कदम म्हणाले. त्यामुळे तात्काळ दौंड पुरवठा शाखेतील हप्तेखोरी बंद न झाल्यास मोठे आंदोलन तहसील कार्यालय येथे उभारणार असल्याचे मराठा संघर्ष योद्धा राजाभाऊ कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.