लाडकी बहीण योजना :केवायसी करण्यासाठी राहिले काही दिवस अन्यथा बंद होणार पैसे.

लोकसेवक वृत्तसेवा 
 विकास क्षत्रिय ता 11
    मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही जुलै 2024 पासून सुरू झाली आहे या योजनेची चर्चा सगळीकडे आहे ही योजना म्हणजे महिलांच्या सबलीकरणासाठी उचललेले एक ऐतिहासिक पाऊल आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला प्रत्येकी 1500रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून केली जाते परंतु सरकारने या योजनेसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य स्थिती असून ती पूर्ण न केल्यास पुढचे येणारे पैसे बंद होऊ शकतात
 योजना राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाची महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे तसेच त्या कुटुंबाच्या नावे कोणतेही चार चाकी वाहन असेल तर अशा लाभार्थी महिलांचे या योजनेचे पैसे बंद होऊ शकतात या योजनेच्या सुरुवातीला सरकारने काही ठराविक निकष ठेवले होते परंतु आणि अशा महिलांनी हप्ता घेतला आहे की ज्या सरकारी नोकरी आहेत किंवा त्यांचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे तर आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे या प्रक्रिये अंतर्गत सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी करणे बंधनकारक केले आहे जर लाभार्थी महिलांनी मिळतात वेळेत केवायसी पूर्ण केली आहे तर त्यांच्या खात्यात येणारा महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता थांबवला जाईल सरकारने सध्या केवायसी प्रक्रियेसाठी 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत जाहीर केली आहे म्हणजेच उरले फक्त आठ दिवस या दिवसात जर केवायसी करते अपूर्ण झाली नाही तर पुढील महिन्यापासून त्या महिलांचा हप्ता थांबवला जाईल अशी शक्यता आहे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की यावेळेस मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी विलंब न करता तत्काळ जवळच्या अधिकृत केंद्रात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आवाहन करण्यात आलेले आहेत सरकारच्या तपासणीत आढळून आल्या आहे की महिलांनी खोट्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे काही लाभार्थी योजना या पात्र असताना देखील आता घेत आहेत त्यांच्यामुळे अशा अपात्र लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्याचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात नुसार फक्त पात्र महिलांचा आत्ता सुरू राहील तर अपात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून रक्कम मिळणार नाही

Post a Comment

Previous Post Next Post