काकड आरतीची दिपोत्सवाने सांगता.

हेचि व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दास l पंढरीचा वारकरी l वारी चुकू न दे हरी l संत संग सर्वकाळ l अखंड प्रेमाचा कल्लोळ l चंद्रभागे स्नानl तुका मागे हेचि दान l
 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ll 
 पुण्यदायी कार्तिक महिन्यात सुरु असलेल्या कार्तिक स्नान.. काकडा आरतीची आज सांगता. वारकरी सश्रद्ध मनाने तुकोबांचे मागणे काकड आरतीची आज सांगता झाली कोजागिरी पौर्णिमेला या काकड आरतीची सुरुवात झाली होती उद्धट तावशी उदमाई वाडी परिसरातील भजनी मंडळांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वसामान्य लोकांची पहाट मंजुळ स्वरांनी गोड केली या काकड आरतीला दररोज काकड आरती ज्ञानदेव व तुकोबांचे अभंग गवळण व दररोज एका ग्रामस्थांकडून विठ्ठल रुक्मिणीला अभंग अभिषेक करण्यात येत होता या ठिकाणच्या काकड आरती परंपरा खूप दिवसापासून चालू आहे या आरतीसाठी सक्रिय सहभाग असणारे उद्धट येथील श्री अर्जुन महाराज क्षीरसागर तसेच त्यांचे भजनी मंडळ त्याचबरोबर उदमाई वाडी येथील श्री नामदेव शेलार तसेच चंद्रकांत घाडगे व त्यांचे भजनी मंडळ या सर्वांनी मिळून पूर्ण एक महिना दररोज अखंड काकड आरती केली

Post a Comment

Previous Post Next Post