वृत्तसेवा लोकसेवक न्यूज
जनसंपर्क कार्यालय
अकलूज
लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते -पाटील साहेबांनी अकलूज म्हणजे आपले एक कुटुंब मानले आहे या अकलूज शहरातील प्रत्येक नागरिक माझेसाठी कुटुंबातील सदस्य आहेत त्यामुळे अकलूज शहरातील प्रत्येक नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण करुन देणे त्यांचे सुखा दुःखात सहभाग घेणे हे माझे कर्तव्य व जबाबदारी आहे.
अकलुज नगरपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे.त्याबद्दल आज अकलूज शहरातील नागरिक व्यापारी, तसेच जनसेवा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. अकलूज शहरात आपल्या संघटनेबद्दल लोकांचे एकदम चांगले मत आहे हे या चर्चेतून दिसून आले आहे. मी स्वतः ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता असल्याने मला ही लोकांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आहे.
आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने, मेहनतीने ही निवडणूक लोकांसाठी लढायची आहे आणि जिंकायची आहे.
अकलूज येथील नागरिकांच्या मनात जे चालले आहे ते म्हणजे यावेळी जनसेवक निवडून द्यायचे..
आपलं अकलूज, आपलीच जनसेवा !