घराणेशाहीची मजबूत पकड - कार्यकर्त्यांची मात्र कोंडी!!

विरोधक वेगळे, पण वारसा समान! 
 इंदापूरमध्ये भरणे–पाटील गटात कुटुंबीयांनाच उमेदवारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी लोकसेवक न्यूज नेटवर्क इंदापूर

 (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात असला, तरी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत दोघांची भूमिका मात्र एकसारखीच असल्याचे चित्र आहे. भरणे यांचे चिरंजीव बोरी येथून पंचायत समितीसाठी, तर पाटील यांची कन्या बावडा गटातून जिल्हा परिषदेसाठी उभ्या राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का?” असा सवाल उघडपणे केला जात आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी न देता उमेदवारी थेट कुटुंबीयांनाच दिली जात असल्याने तालुक्यात घराणेशाहीचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांचा सवाल
 • वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी नाही
 • उमेदवारी थेट नेत्यांच्या कुटुंबात 
• स्थानिक नेतृत्वाची घुसमट 
• संघटनात्मक लोकशाहीवर प्रश्नचिन्ह

Post a Comment

Previous Post Next Post