लोकसेवक न्यूज नेटवर्क.
उद्धट ता 21
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोलपवाडी येथे आनंदी बाजार व खाऊगल्ली चा कार्यक्रम पार पडला यामध्ये विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारातील अनुभवासाठी या बाजाराचे आयोजन केले होते.
आनंदी बाजारचे उद्घाटन सणसर केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री किरण भोसले व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विकास सोनबा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाजी मंडई स्टेशनरी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणण्यात आले होते या कार्यक्रमाला सणसर केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक प्रतिनिधी तसेच उदमायवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती या बाजारातून मिळाली तसेच डिजिटल व्यवहाराची देखील माहिती मुलांना यावेळी मिळाली विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढीस लागावे त्याचबरोबर चलनी नोटांचे त्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण मिळावे याकरिता या आनंद बाजार च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले उदमायवाडी घोलप वाडी उद्धट या परिसरातील सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी बाजार खरेदी करण्यासाठी रांगा लावून वस्तू व खाद्यपदार्थ खरेदी केले
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सावता नाळे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री पोपट सपकळ यांनी केले तर श्री केशव मुंडे यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले यावेळी अंगणवाडीच्या शिक्षिका गीता जुन्नरकर व ज्योती थोरात यांनी देखील कार्यक्रम पार पाडण्यास आपले योगदान दिले