लोकसेवक न्यूज नेटवर्क
दौंड
:-
मराठा समाजातील तरुणांनी कुणबी दाखल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगर ईतर कोणत्याही निवडणुकीत ओबीसी जागेवर अतिक्रमण करून निवडणूक लढवू नये असे मत मराठा संघर्ष योद्धा राजाभाऊ कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मराठा समाजातील युवकांनी जर कुणबी दाखल्यावर ओबीसी जागेवर निवडणूक लढविल्यास ओबीसी समाजाच्या उमेदवारावर अन्याय होईल,त्यांच्या जागेवर अतिक्रमण करणे योग्य नाही त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये पुढील काळात राजकीय मतभेद होऊन जवळचे नाते संबंध देखील दुरावले जाऊ शकतात.या राजकीय संघर्षाने मैत्री संबंध देखील बिघडू शकतात त्यामुळे ओबीसी जागेवर कोणीही मराठा समाजाच्या युवकांनी निवडणुकीत अतिक्रमण करू नये असे माझे स्पष्ट मत आहे.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर जर मराठा समाजाने हातोडा मारला तर ते योग्य ठरणार नाही.त्यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष चालूच राहू शकतो ते कधीही संपुष्टात येणार नाहीत,म्हणून ओबीसी जागेवर निवडणुकीत कोणीही राजकीय अतिक्रमण करू नये असे मराठा संघर्ष योध्दा राजाभाऊ कदम यांनी शेवटी सांगितले.
Tags
विकास क्षत्रिय